---Advertisement---

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 2026 | Post Matric Scholarship Maharashtra

By Mayur

Updated on:

post matric SCholarship
Post Matric Scholarship Maharashtra 2026
📢 महाडीबीटी शिष्यवृत्ती फॉर्म सुरू!  |  Post Matric Scholarship 2026  |  मुदत: ३० जून २०२६  |  पोर्टल: MahaDBT
Post Matric Scholarship Applications Open ● सामाजिक न्याय विभाग

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना २६: Post Matric Scholarship Maharashtra 2026

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे SC आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वपूर्ण शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना. १००% शिक्षण शुल्क माफ!

📅 अद्ययावत: एप्रिल २०२६ 🌐 mahadbtmahait.gov.in 📋 वर्ग: SC & Navbuddha 📝 महाडीबीटी ऑनलाइन अर्ज

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरू झाल्याची तारीख
Open Live
अर्ज करण्याची शेवटची तारीख
३० जून २०२६
सर्व पात्र उमेदवारांना विनंती आहे की तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेवटच्या दिवसांची वाट न पाहता महाडीबीटी पोर्टलवर आपला अर्ज लवकरात लवकर पूर्ण करावा.

योजनेचा सारांश (Scheme Overview)

₹२.५० लाखवार्षिक उत्पन्न मर्यादा
₹१२००/महिनाकमाल निर्वाह भत्ता
१००% शुल्कशिक्षण शुल्क माफी

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना (Post Matric Scholarship Maharashtra) ही महाराष्ट्र राज्य सरकार आणि भारत सरकारची संयुक्त कल्याण योजना आहे. दहावी (10th) नंतरच्या शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्याला व्यावसायिक शिक्षण सहज घेता यावे यासाठी यात १००% शिक्षण व परीक्षा शुल्काची माफी दिली जाते.

पात्रता आणि निकष (Eligibility Criteria)

पात्रता प्रकार आवश्यक निकष (Details)
रहिवासी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी (Domicile) असावा.
जातीचा प्रवर्ग विद्यार्थी अनुसूचित जाती (SC) किंवा नवबौद्ध (Navbuddha) प्रवर्गातील असावा.
उत्पन्न मर्यादा कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹२,५०,००० पेक्षा अधिक नसावे.
शिक्षण दहावी (SSC) उत्तीर्ण करून एखाद्या मान्यताप्राप्त महाविद्यालयात किंवा ITI मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
अतिरिक्त अट ग्रुप १ व्यतिरिक्त इतर ग्रुपच्या कोर्सेसमध्ये विद्यार्थी नापास झाल्यास एका वर्षासाठी शिष्यवृत्ती बंद होते. तसेच ही शिष्यवृत्ती जास्तीत जास्त २ व्यावसायिक कोर्सेससाठी लागू आहे.

योजनेचा निर्वाह भत्ता (नवे गट/Groups नुसार)

विद्यार्थ्यांना मिळणारा मासिक निर्वाह भत्ता (Maintenance Allowance) त्यांच्या अभ्यासक्रमाच्या गटानुसार (Group) आणि ते वसतिगृहात राहतात की घरी यावरून ठरतो:

अभ्यासक्रम गट (Course Group) Hosteller (वसतिगृह) Day Scholar (घरून येणारे)
गट १: Professional Degree/PG (उदा. MBBS, Engineering, MBA, Agri, Veterinary) ₹१,२०० / महिना ₹५५० / महिना
गट २: Other Professional Degree/Diploma (उदा. Pharmacy, Nursing, B.Ed, LLB) ₹८२० / महिना ₹५३० / महिना
गट ३: इतर सर्व पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस (उदा. B.A., B.Sc., B.Com, M.A., M.Sc.) ₹५७० / महिना ₹३०० / महिना
गट ४: ११वी, १२वी आणि सर्व ITI कोर्सेस ₹३८० / महिना ₹२३० / महिना
💡 अतिरिक्त लाभ: या निर्वाह भत्त्याव्यतिरिक्त अपंग विद्यार्थ्यांसाठी (Disability Allowances) रिडर भत्ता (₹२४०/महिना), ट्रान्सपोर्ट भत्ता (₹१६०/महिना) आणि कोचिंग भत्ता देखील दिला जातो. तसेच शिक्षण व परीक्षा शुल्क १००% माफ होते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

  • तहसीलदारांनी दिलेला अधिकृत उत्पन्नाचा दाखला (Income Certificate – कमाल २.५ लाख)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • मागील परीक्षेची गुणपत्रिका (SSC, HSC किंवा तत्सम)
  • वसतिगृह प्रमाणपत्र (Hostel Certificate – Hosteller भत्ता हवा असल्यास)
  • गॅप सर्टिफिकेट (शिक्षणात खंड असल्यास)
  • आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक असावे)

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Apply Process Step-by-Step)

01
महाडीबीटी पोर्टलवर जा
सर्वप्रथम mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ‘Post Matric Scholarship’ सर्च करा.
02
नवीन नोंदणी
“New Applicant Registration” पर्यायावर क्लिक करा आणि आपला आधार क्रमांक वापरून प्रोफाईल (१००%) तयार करा.
03
योजना निवडा
सामाजिक न्याय विभागातील “Government of India Post-Matric Scholarship” ही योजना अप्लाय करण्यासाठी निवडा.
04
अर्ज सबमिट करणे
सर्व कागदपत्रे जोडून फॉर्म Submit करा. तुमच्या अर्जावर ‘Approved’ मार्क येईपर्यंत त्याचे स्टेटस ट्रॅक करा.

Important Links

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Post Matric Scholarship Maharashtra साठी उत्पन्न मर्यादा किती आहे?
या भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. हा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
२०२५-२०२६ या वर्षासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याची शेवटची तारीख सामान्यतः ३० जून २०२६ पर्यंत असते. (नवीनतम तारखा पोर्टलवर तपासत राहा.)
इंजिनीअरिंग (Engineering) किंवा मेडिकल (Medical) चा विध्यार्थी असल्यास भत्ता किती मिळतो?
इंजिनीअरिंग किंवा मेडिकल हे कोर्सेस गट १ (Group 1) मध्ये येतात. यासाठी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याला ₹१,२००/महिना आणि घरून येणाऱ्या विद्यार्थ्याला ₹५५०/महिना मिळतात. याशिवाय शिक्षण शुल्क १००% माफ असते.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ही योजना किती वेळा वापरता येते?
जास्तीत जास्त २ व्यावसायिक कोर्सेससाठी विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment